Tuesday, May 7, 2024
Homeनगरनगर शहर पाणीप्रश्नावर शिवसेना आक्रमक

नगर शहर पाणीप्रश्नावर शिवसेना आक्रमक

उपनगरातील पुरवठा आठ दिवसांत सुरळीत न झाल्यास सेनेकडून आंदोलनचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐन उन्हाळातच उपनगरातील प्रभाग 1 ते 7 च्या नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. महापालिकेने वॉल्व्हमनची संख्या वाढवावी. पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न आठ दिवसांत सोडवा; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, या इशाराचे निवेदन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी मनपा आयुक्त मायकलवार यांना दिले.

- Advertisement -

यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते,माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे उपस्थित होते. सावेडी उपनगरमध्ये गेल्या महिन्याभरापासून प्रभाग 1 ते 7 या परिसरामध्ये कमी दाबाने पाणी येत आहे. तसेच काही ठिकाणी पाणीच येत नाही. गायकवाड कॉलनी, सिव्हील हाड्को, भिस्तबाग, बोल्हेगाव, श्रमिकनगर आदी भागामध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी मिळते कारण या भागात चार-चार वॉल्व्ह आहेत. त्यामुळे काही भागात पाणी मिळते व काही भागात पाणी मिळत नाही. मेनलाईन फ्लश धुवून घेण्याबाबत आयुक्तांनी संबंधितांना आदेश द्यावेत.

लवकरच पाऊसाळा सुरू होणार आहे. या काळात नादुरुस्त वॉल्व्हमुळे पाणी दूषित होऊन कावीळ, कॉलरा, यासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आताच पाण्याचे सर्व लिकेज वॉल त्वरित दुरुस्त करून घेणे आवश्क व गरजेचे आहे. उपनगरामध्ये 10 वॉल्व्हमन असून त्यांच्यावर संपूर्ण सातही प्रभागामध्ये ठराविक कालावधीत पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

या परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सध्या असलेली वॉल्व्हमनची संख्या कमी पडत आहे. त्यांची संख्या वाढवून प्रत्येक प्रभागास दोन वॉल्व्हमन याप्रमाणे नेमणूक करावी. पाण्याच्या टाक्या ह्या पूर्ण भरल्या जात नाही. यामुळे पाण्याचा दाब कमी होऊन सर्व नागरिकांना पाणी मिळत नाही. सर्व पाण्याच्या टाक्या पूर्ण भरण्यात याव्यात. या सर्व मागण्यांवर आठ दिवसांत कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून या प्रश्नाला वाच्या फोडण्यात येईल. यास महानगरपालिका व प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या