Sunday, May 18, 2025
Homeनाशिकदेवळा : लोहोणेर येथील गिरणा पात्रात उडी घेत २२ वर्षीय महिलेची आत्महत्या

देवळा : लोहोणेर येथील गिरणा पात्रात उडी घेत २२ वर्षीय महिलेची आत्महत्या

लोहोणेर : येथील शेतमजुरी करणाऱ्या २२ वर्षीय महिलेने गिरणा नदी पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

वैष्णवी सचिन गवळी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेने लोहोणेर गावालगत असणाऱ्या गिरणा नदी पुलावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करीत आहेत.

एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. यामुळे लोहोणेर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की लोहोणेर येथील जुनी ग्रामपंचायत इमारत लगत राहत असलेल्या वैष्णवी सचिन गवळी ( वय २२) ही विवाहित महिला शेती कामासाठी गेली होती. दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सदर महिला घरी आल्यानंतर थेट गिरणा नदी वरील पुलावर जाऊन नदीत उडी घेतली.

याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच येथील काही युवकांनी तिचा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालय देवळा येथे नेण्यात आला. शवविच्छेदना नंतर सायंकाळी या विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 42 गुणनियंत्रकांची कृषी केंद्रांवर राहणार करडी नजर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात शेतकर्‍यांना योग्य दरात दर्जेदार बियाणे खते आणि कीटकनाशके उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी विभागाने नियोजन आखले आहे. जिल्ह्यात कृषी...