नाशिकरोड : येथील बस स्टेशन परिसरात असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे.
नाशिकरोड परीसरातील बस डेपो जवळ कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
- Advertisement -
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.