Friday, May 3, 2024
Homeनाशिकवणी : तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणारा हवालदार जाळ्यात

वणी : तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणारा हवालदार जाळ्यात

नाशिक : हॉटेलवर कारवाई न करता ते उशिरपर्यंत सुरू ठेवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हवालदारास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वणी पोलीस ठाण्यात सापळा रचुन रंगेहाथ अटक केली.

वसंत दगडू खताळ असे लाचखोर हवालदाराचे नाव असून ते वणी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

- Advertisement -

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये तक्रारदाराचे हॉटेल आहे. सदरचे हॉटेल कायम तसेच उशिरपर्यंत सुरू ठेवण्यासाठी हवालदार खताळ याने तक्रारदारांकडून ८ हजार रुपयांचा मासिक हप्ता मागितला होता.

लाचखोर हवालदार वसंत खताळ याने या हप्तापैकी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी फेब्रुवारी महिन्यात केली होती. त्यानुसार, तक्रारदाराने २६ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्यानुसार सापळापूर्व पडताळणी केल्यानंतर या विभागाने वणी पोलिस ठाण्यामध्येच सापळा रचला होता. त्या प्रमाणे पंचासमक्ष तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हवालदार खताळ यास रंगेहाथ अटक केली.

याप्रकरणी वणी पोलिसात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या