Friday, May 3, 2024
Homeनाशिकसिन्नर : पांगरीजवळ लहान भावाकडून मोठ्याचा खून; दोघांना अटक

सिन्नर : पांगरीजवळ लहान भावाकडून मोठ्याचा खून; दोघांना अटक

वावी : दारू पिणाऱ्या भावाकडून मोठ्या भावाचा खून झाल्याची घटना आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. डोक्यात फावड्याने वार करून आपणच त्याचा खून केल्याची कबुली लहान भावाने दिली असून त्याच्यासह दोघांना वावी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पांगरी – मिठसागरे रस्त्यावर कासारवस्ती आहे. तिथे रवींद्र भास्कर कासार (२८) व जालिंदर भास्कर कासार (२६) हे दोघे आई वडिलांसोबत वास्तव्याला आहेत. जालिंदर ला मद्याचे व्यसन असल्याने घरात नेहमीच भांडणे होत असत. याबाबत रवींद्र हा  वारंवार समजावून सांगत होता. मात्र, त्याच्या वागण्यात फरक पडत नव्हता. दोन दिवसांपूर्वी दोघे भाऊ आणि वडील यांच्यात यामुळे वाद झाले होते.

- Advertisement -

याचा राग मनात धरून जालिंदर यानेच आपला पांगरी येथील सहकारी कलीम आजम कादरी याचे मदतीने शनिवारी दि.१९ रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याचा जालिंदरचा काटा काढला. विशेष म्हणजे सध्या लॉक डाऊन असल्याने सर्वच मद्याविक्री बंद असली तरी जालिंदर आणि कलिम या दोघांनीही मद्याचे सेवन केले होते.पांगरी येथील प्रवीण पगार यांच्याकडून त्यांनी मद्य विकत घेतल्याची कबुली पोलिसांना दिली.

घरापासून हजार फूट अंतरावर असणाऱ्या गाईंच्या गोठ्याजवळ जालिंदर नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गेला होता. सकाळी वडील भास्कर कासार हे दूध आणण्यासाठी गेले असता त्यांना जालिंदर रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडल्याचे आढळून आले. ही बाब ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब कांदळकर यांनी पोलीस ठाण्यात कळवली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी सहाय्यक निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी रवींद्र याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने आपणच एका मित्राच्या मदतीने जालिंदर चा खून केल्याची कबुली दिली. त्याच्या डोक्यात फावड्याने वार करून तो मृत झाल्याची खात्री केल्यावर दोघे तेथून निघून गेल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात वरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी माधव रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या. हवालदार रामनाथ देसाई याप्रकरणी तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या