खामखेडा : सावकी ता.देवळा येथील रायगडवस्ती जवळ अचानक आलेल्या आडव्या कुत्र्याला वाचविण्याच्या नादात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावर घसरली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. श्रावण पवार (४३, रा.मोकभणगी ता.कळवण) असे युवकाचे नाव आहे.
- Advertisement -
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हा युवक दुचाकीवरून (एमएच ४१ बीए ३५८३) मोकभणगी ता. कळवण ह्या आपल्या गावावरुन सावकी फाट्यामार्गे सटाण्याकडे जात असतांना सावकी जवळ हा अपघात घडला.
येथील रायगड वस्ती जवळ रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने कुत्र्याला वाचविण्याच्या नादात दुचाकीस्वाराचे भरधाव असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावर घसरून अपघात झाला. या अपघातात युवकाला जबर मार लागल्याने हा युवक जागीच ठार झाला.
या अपघाताची देवळा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.