देवळाली कॅम्प | वार्ताहर
- Advertisement -
भगूर येथील नगरपालिका सार्वजनिक शौचालय टाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली.
दरम्यान राममंदीर रोडवरील टी झेड शाळेसमोर असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा टाकीचा अचानक स्फोट झाला. सकाळी नऊ च्या सुमारास ही घटना घडली. शौचालयाच्या सेफ्टिक टँकमध्ये विषारी वायू साठून त्याचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
या स्फोटानंतर शौचालयाचा काही भाग कोसळला आहे. तर सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. पोलिस, प्रशासन व लोकप्रतिनिधी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.