सिन्नर : देशभरात संचारबंदी लागू असताना शहरातील शिंपी गल्लीत हॉटेल उघडून नियम भंग करणाऱ्या हॉटेल चालकासह तीन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -
मुकुंद मुरलीधर भावसार असे या हॉटेल चालकाचे नाव आहे. भावसार यांनी त्यांचे यश अश्विनी हॉटेल उघडून ग्राहकांना वडा रस्सा विकत होते. दरम्यान सकाळी नऊच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करीत हॉटेलमधील वडा पाव, रस्सा व यासाठीचे लागणारे साहित्य जप्त केले.
यावेळी हॉटेलमध्ये असलेल्या तीन ग्राहकांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिंपी गल्लीत हॉटेल सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलिसांनी हा छपा टाकला.
पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील, एपी आय रसेडे, उपनिरीक्षक माळी यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी हा छापा टाकला. भावसार यांच्या विरोधात कलम १८८, २६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.