नाशिक : २०२० वर्षासाठी मध्य रेल्वेने विविध घटना, स्थळ यांचा उल्लेख असणारी दिनदर्शिका प्रसिद्ध केली असून यामध्ये नाशकातील पांडवलेणीला स्थान देण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री संजीव मित्तल यांच्या हस्ते या रेल्वे दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे.
दरम्यान मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री संजीव मित्तल यांनी मध्य रेल्वेचे वॉल कॅलेंडर २०२० जाहीर केले. या वॉल कॅलेंडरमध्ये महात्मा गांधी यांचा १५० वा वर्धापन दिन, सेंट्रल रेल पुश-पुल राजधानी एक्सप्रेस, वन टच एटीव्हीएम, ताडोबा अभयारण्य, शनिवारवाडा, पांडव लेणी, सोलापूर रेल्वे स्टेशन इमारत, एसी लोकल, स्वच्छ आयकॉन प्लेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारत यांचा दिनदर्शिकेत समावेश करण्यात आला.
नाशकातील प्रसिद्ध असलेल्या पांडव लेणी तथा त्रिरश्मी लेणी चा समावेश या वॉल कॅलेंडरमध्ये करण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या दिनदर्शिकेत पांडव लेणीचा समावेश झाल्याने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या प्रकाशनावेळी सकेत कुमार मिश्रा, सरचिटणीस मॅनेजर, श्शिवाजी सुतार मुख्य जनसंपर्क अधिकारी, ए.के. जैन, श्री. व्ही. चंद्रशेखर, डॉ. ए.के. सिंग, मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.