Friday, May 16, 2025
Homeनाशिकनाशिकरोड : जेतवन नगर येथे कुत्र्यावरून दोन गटात हाणामारी

नाशिकरोड : जेतवन नगर येथे कुत्र्यावरून दोन गटात हाणामारी

नाशिक : लहान मुलाच्या अंगावर कुत्रा धावून आल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन दगडफेक करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) दुपारी जयभवानीरोडच्या जेतवन नगर परिसरात घडली. या प्रकरणी परस्पर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत.

- Advertisement -

श्रीकांत माणिक वाकोडे (रा. जेतवन नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची लहानमुले अंगणात खेळत असताना शेजारच्या सुनिता आवारे यांचा कुत्रा चावण्यासाठी मुलांच्या अंगावर धावून गेला. वाकोडे आवारे यांना समजून सांगण्यासाठी गेले असता याचा राग येऊन सुनिता आवारे, काकाश आवारे, साहिल आवारे, राजु दिवे यांनी त्यांना शिविगाळ करत मारहाण केली. तसेच कुर्‍हाडीने जखमी केले.

तर वाकोडे यांच्या विरोधात सुनिता आवारे यांनी तक्रार दिली असून त्यानुसार, जुन्या भांडणाची कुरापत काढून बारकु वाकोडे, राजु पगारे, सनी पगारे, राहुल खरे यांनी शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली.

तसेच त्यांच्या घरावर दगड फेकून तोडफोड केली. या दोन्ही गटांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरिक्षक जी.एम. काकड करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोदी

“आप बात करेंगे तो न्यायमुर्ती आपकी बात मान लेंगे…”शरद पवार, बाळासाहेब...

0
मुंबई | Mumbai शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे आगामी पुस्तक 'नरकातला स्वर्ग'चे प्रकाशन शनिवारी होणार आहे. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे-प्रतिदावे...