चांदवड : तालुक्यातील देवरगाव येथील शेतकऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
- Advertisement -
दरम्यान आज सकाळी आलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. देवरगाव येथील शेतकरी चांदवड येथील रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. तपासणी केल्यानंतर त्यांची लक्षणे करोना सदृश्य आढळल्याने त्यांना तातडीने नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आले होते.
यानंतर आज आलेल्या अहवालातून त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईकांची तपासणी करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यापैकी १६ जण क्वारंटाईन करण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे. तसेच कंटेनमेंट झोन बद्दलची देखील कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.