मनमाड : जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच असून आता पर्यंत करोनामुक्त असलेल्या मनमाड शहरात करोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे.
- Advertisement -
दरम्यान शहरातील एका ४८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सदर महिला पोलिसाची आई आहे. मालेगाव शहरात बंदोबस्तासाठी तैनात असलेला हा पोलीस काही दिवसा पूर्वी आईला भेटण्यासाठी मनमाड येथे आला होता. या पोलिसाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता.
त्यानंतर तो आईला भेटण्यासाठी मनमाड येथे आल्यानंतर आज आलेल्या जिल्हा अहवालात या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह मिळून आला आहे. सदर महिला शहरातील आनंदवाडी परिसरात राहत असून हा परिसर सील करण्यात आला आहे.