Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकआता नाशकातही थिएटर, नाट्यगृहे ३१ मार्चपर्यंत बंद

आता नाशकातही थिएटर, नाट्यगृहे ३१ मार्चपर्यंत बंद

नाशिक : मुंबई, पुणे, नागपूर नंतर आता नाशिकमधील व्यायामशाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव या महिना अखेरीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा वगळून शाळा, महाविद्यालये देखील बंद करण्यात आली आहेत. तर ग्रामीण भागातील शाळा सुरु राहणार आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता राज्य शासनाने संसर्गजन्य आजार

- Advertisement -

टाळण्यासाठीचा 1897 (2) या कायद्याची अंमलबजावणी शुक्रवार ( दि.१३ ) च्या मध्यरात्रीपासून करण्याचा निर्णय घेतला. हॉटेल, उपाहरगृहे, मॉल्स बंद करण्यात आले आहेत. परंतु किराणा, भाजीपाला, दूध अशा अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने सुरु राहणार आहेत.

आज सकाळपर्यंत राज्यात कोरोनाचे ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुका दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, विभाग प्रमुख, पोलिस प्रशासन यांना सूचना दिल्या आहेत.

आयटी कर्मचाऱ्यांनी घरी बसून काम करावे
करोना व्हायरसला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहर व जिल्ह्यातील आयटी उद्योग आस्थापन सेवकांना घरी बसून काम करणे शक्य आहे. त्यांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे शक्य असल्यास 31 मार्चपर्यंत आयटी उद्योगांनी सेवकांना घरी बसून काम करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या