Monday, May 19, 2025
Homeनाशिकशेतकऱ्यांचा शेतमाल सडतोय शेतातच; सावकाराला द्यायला पैसे द्यायचे कोठून?

शेतकऱ्यांचा शेतमाल सडतोय शेतातच; सावकाराला द्यायला पैसे द्यायचे कोठून?

नाशिक | विजय गिते :
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखावा,यासाठी ग्रामीण व शहरीभागात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व आठवडे बाजार, मार्केट कमिट्या बंद असल्याने भाजीपाल्यासह कांदा, टोमॅटो, वांगी, डाळिंब तसेच इतर कृषिमाल शेतात पडून आहे.त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

- Advertisement -

देशभरात सर्वत्र करोना संसर्गजन्य रोगाने ग्रामीण व शहरी भागात थैमान घातल्याने सर्व काही लॉकडाऊनमध्ये लॉक झाले आहे. तसेच वाहतूकही पूर्णपणे बंद झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

शेतातून काढलेला अन बांधावर टाकलेला कांदा संभाळायचा तरी किती ? दिवस याच चिंतेत कांदा उत्पादक आहेत.कारण सद्या निघणारा रब्बीचा कांदा जास्त दिवस टिकत नाही. अन तो एका जागेवर राहील्यास सडतो. लॉकडाऊन उघडल्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळेल का ? याबाबत शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे.

शेतातून माल निघण्याचा कालावधी व करोना विषाणूमुळे झालेला लॉकडाऊन एकाच वेळी झाल्याने शेतीमालाचे नुकसान होत आहे.राज्यात शेतकरी व कांदा सूञ महत्त्वाचे समजले जाते.
शेतकरी कांदा करण्यासाठी सावकराकडून कर्ज घेतात. माल बाजारात विक्री केल्यानंतर मग सावकाराला पैसे देतात. परंतु, यावर्षी सावकाराला पैसे कोठून द्यायचे हा प्रश्न बळीराजाला पडला आहे.

– भारत दिघोळे, अध्यक्ष राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक दौरा रद्द

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सोमवार (दि.19) पासून दोन दिवसांच्या नाशिक दौर्‍यावर येणार होते. मात्र, त्यांचा...