Monday, November 18, 2024
Homeनाशिकआता मोबाईल वॉलेटवरूनदेखील फास्टॅग रिचार्ज होणार

आता मोबाईल वॉलेटवरूनदेखील फास्टॅग रिचार्ज होणार

अजित देसाई । नाशिक
वाहनधारकांना फास्टॅग वापरणे सुलभ व्हावे; यासाठी रिझर्व बँकेकडून रिचार्जचे नियम सोपे करण्यात आले आहेत. आता युपीआयसोबतच एटीएम व क्रेडिट कार्ड, प्री-पेड इंस्ट्रुमेंट्स, मोबाईल वॉलेटवरूनदेखील फास्टॅग रिचार्ज करून घेता येणार असल्याचे आरबीआयकडून पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

देशातील राष्ट्रीय महामार्गावर असणार्‍या टोल नाक्यांवर दि.15 डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी यासाठी महिनाभराची मुदत वाढवून देण्यात आली असून दि. 15 जानेवारीपासून मात्र टोलनाक्यांवरील सर्वच मार्गिका फास्टॅग असणार आहेत. तोपर्यंत प्रत्येक नाक्यावर फास्टॅग आणि रोखीने टोल आकारणी केली जात आहे. या कालावधीनंतर मात्र एखादे वाहन फास्टॅग मार्गिकेतून विना फास्टॅग जात असेल तर त्या वाहनाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

- Advertisement -

दि. 30 डिसेंबर रोजी आरबीआयने फास्टॅग रिचार्ज संबंधी पत्रक जारी केले असून त्यात ग्राहक त्यांच्या अधिकृत फास्टॅग खात्यांना सर्व अधिकृत डिजिटल मॉडेल्स आणि पेमेंटच्या साधनांसह लिंक करू शकतील असे म्हटले आहे. यात यूपीआय खाती आणि मोबाईल वॉलेट्सचा देखील समावेश असेल. फास्टॅग खाती रिचार्ज करण्यास सुलभता वाढावी आणि फेल्ड ट्रान्झेक्शन व्यवहारांची प्रकरणे जलद सोडवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ग्राहकांना अधिक पैसे भरण्याचे पर्याय देऊन या प्रणालीची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने आणि प्रणालीतील सहभागींमध्ये स्पर्धा वाढविण्याच्या उद्देशाने आता सर्व अधिकृत पेमेंट सिस्टिमला फास्टॅगशी जोडण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ग्राहकांना नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) प्रणाली अंतर्गतफास्टॅगला भीम यूपीआयसह रिचार्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. भीम यूपीआय आधारित मोबाईल अ‍ॅपद्वारे वाहन मालक त्यांच े फास्टॅग रिचार्ज करू शकतील आणि त्यांना टोल प्लाझावर लांब रांगा लागण्याची गरज भासणार नाही असे एनपीसीआयच्या वतीने सांगण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या