कळवण : लॉक डाऊनच्या काळात अवैध मद्य विक्रीवर चाप राज्य उत्पादन शुल्क ठिकठिकाणी कारवाई करीत आहे. नुकतेच कळवण शहरात बेकायदेशीर पद्धतीने मद्य विक्री करणाऱ्या वाईन्स शॉपवर कारवाई करण्यात आली आहे.
- Advertisement -
दरम्यान काल (दि.२७) रोजी संध्याकाळी ४ वाजता ही कारवाई करण्यात आली. यावेळी धाड टाकत मालाची तपासणी केली असता सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संचारबंदी व लॉकडाऊन कालावधीत अवैध वस्तू विक्रीवर बंदी असताना शहरात एका वाईन्स शॉप मधून किराणा दुकानाच्या आडून मद्य विक्री होत असल्याची माहिती मिळाली. राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अचानक धाड टाकत कारवाई केली. सदर वाइन शॉप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आर. एस . सोनवणे यांनी दिली.