Saturday, May 4, 2024
Homeनाशिकघोटी येथील समर्थ सह्याद्री रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत होणार...

घोटी येथील समर्थ सह्याद्री रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत होणार मोफत उपचार

घोटी : गंभीर व मोठे आजार म्हटले कि सर्वात प्रथम खर्चाचा गंभीर प्रश्न निर्माण होते त्यासाठी शासनाने गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबातील रुग्णाना दिलासा देण्यासाठी महात्मा फुलें जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना सुरू केली.

ही योजना आता इगतपुरी या आदिवासी तालुक्यातही सुरू झाल्याने गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होणार आहे. घोटीतील समर्थ सह्याद्री रुग्णालयात या योजनेअंतर्गत मोठ्या व गंभीर आजारावर मोफत उपचार मिळणार आहेत.

- Advertisement -

या सुविधेमुळे इगतपुरी तालुक्यातील व ग्रामीण भागातील गरज व आदिवासी कुटुंबातील रुग्णांसाठी ही दिलासादायक बाब आहे. या सुविधेमुळे या भागातील रुग्णाना नाशिक व मुंबई सारख्या शहरात उपचार घेण्यासाठी जाण्याची गरज भासणार नाही.

घोटी येथील समर्थ सह्याद्री या रुग्णालयात यापुर्वीही गंभीर व मोठया आजारावर उपचार होत. एक विश्वासपात्र हॉस्पिटल म्हंणून या रुग्णालयाकडे पाहिले जाते.

इगतपुरी तालुक्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना सुरू व्हावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यासाठी तालुकास्तरावर प्रयत्नही सुरु होते. अखेर त्या योजनेसाठी शासनाच्या अटी व नियमाच्या अधीन राहून समर्थ सह्याद्री हॉस्पिटल मधे या योजनेतून उपचारासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

त्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री ना राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना छगन भुजबळ, यांच्यासह आ हिरामन खोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांचे विशेष सहकार्य लाभले.

या योजनेतून गरीब, गरजू तसेच पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या मोठया व गंभीर रुग्णावर मोफत दर्जेदार व चांगल्या प्रकारची वैद्यकीय उपचार दिले जातील अशी माहीती सह्याद्री समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ अमन नायकवडी, डॉ दत्ता सदगीर, डॉ महेंद्र शिरसाठ, डॉ शैलेश देशपांडे तसेच रामदास गव्हाणे यांनी दिली. शासनाने निर्देशित केलेल्या विविध मोठ्या आजारांचा या योजनेत समावेश आहे..

- Advertisment -

ताज्या बातम्या