Monday, May 19, 2025
Homeनाशिकनांदगाव : सबवेचे काम करतांना रेल्वे कर्मचाऱ्यांकडुन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नांदगाव : सबवेचे काम करतांना रेल्वे कर्मचाऱ्यांकडुन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नांदगाव : एकीकडे देश व राज्य सरकार करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजना करीत आहे. करोना रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू करण्यात आहे. तर दुसरीकडे रेल्वेचे अधिकारी लॉकडाऊन काळात सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडवित असल्याचा धक्कादायक प्रकार येथील रेल्वे गेटजवळ सुरू सबवेच्या कामावर समोर आला आहे.

- Advertisement -

नांदगाव शहरात सबवे चे काम सुरू असून या ठिकाणी २५ ते ३० रेल्वेचे कर्मचारी एकत्रितपणे येऊन कोणतेही सोशल डिस्टन्स न पाळता काम करीत आहेत. ज्या अधिकाऱ्यांवर लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी आहे. ते अधिकारी त्याला हरताळ फासत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लॉकडाऊन काळात एखाद्या ठिकाणी गावात २५ ते ३० नागरिक एकत्रितपणे आले तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या प्रकारामुळे रेल्वे प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

क्रिकेट

Asia Cup 2025 Update: भारतीय क्रिकेट संघाची आशिया चषक स्पर्धेतून माघारीची...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशियाई...