त्र्यंबकेश्वर : पंढरपूरवारीसाठी शासनाने शिवशाही बस संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टला उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने केली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी दिली.
दरम्यान करोना मुळे राज्यात आता ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढला आहे. त्यामुळे पंढरपूर वारी होणार की नाही याबाबत सांशकता निर्माण झाली आहे.यासंदर्भात नुकतीच पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठकी पार पडली. या बैठकीत ३० मे निर्णय घेऊ असे प्रमुख सात दिंड्याना सांगण्यात आले आहे.
नंतर दोन दिवसांनी लॉकडाऊन मध्ये वाढ झाली. वरील बैठकीत वाहनाने वारी असा पर्याय सुचवण्यात आला होता. दरम्यान संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे प्रस्थान सहा जूनला होणार होते. पण आता पायी दिंडी पालखी शक्य नाही हे शासन वारकरी, दिंड्या, संत, संस्थाने जाणून आहेत.
परिणामी संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टने या पालखी तील प्रमुख दिंडीकरी मानकरी गोसावी महाराज बेलापूरकर व डावरे महाराज यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवशाही बसची मागणी शासनाकडे केली आहे.