Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी

नाशिककरांनो घरीच थांबा; उद्यापासून घरपोच भाजीपाला मिळणार : जिल्हाधिकारी

नाशिक । कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळा असे आवाहन करुनही भाजीबाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत अाहे. ते बघता गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना थेट घरपोच भाजीपाला दिला जाणार आहे. त्यामुळे बाजारातील गर्दीवर नियंत्रण येईल.

आठवडाभर पुरेल इतका भाजीपाल पिशवित भरुन तो नागरिकांना वितरीत केला जाईल. यासाठी १०० ट्रक मदत घेतली जाणार आहे. आजपासून (दि.२९) १० ट्रकद्वारे भाजीपाला वितरण केले जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

- Advertisement -

कोरोनाचा ससंर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. पण आजही भाजी मार्केट किंवा इतर ठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शनिवारी (दि.२८) लोकप्रतिनिंधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी शहरातील प्रत्येक गल्लीतून भाजीपाल्याच्या ट्रक फिरविल्या जाणार आहे.

त्यासाठी १०० ट्रक आम्ही निवडतोय. ८ दिवस पुरेल इतका भाजी पिशवित भरली जाईल. त्यामुळे कुणालाही भाज्या निवडण्याची गरज नाही. त्यातूनही संसर्ग होणार नसून, या पिशव्या १० ट्रकद्वारे शहरातील गल्लीतून वितरीत केल्या जातील. त्या नागरिकांच्या थेट हातात दिल्या जातील. त्यामुळे कुणालाही बाजारात भाजीसाठी जाण्याची अजिबात आवश्यकता राहाणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या