Tuesday, April 29, 2025
Homeनाशिकसटाणा पोलिसांकडुन धाडसी कारवाई; गावठी मद्याच्या भट्ट्या उद्ध्वस्त

सटाणा पोलिसांकडुन धाडसी कारवाई; गावठी मद्याच्या भट्ट्या उद्ध्वस्त

डांगसौंदाणे : सर्वत्र लॉकडाऊन असताना मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली गावठी मद्याची विक्री सटाणा पोलिसांनी हाणून पाडली आहे.

तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्यातील गावांमधे गावठी मद्य विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सटाणा पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश जाधव, जयंतसिंग सोळंके, राहुल शिरसाठ, पंकज सोनवणे यांच्या पथकाने तिळवण परिसरातील डोंगरात कार्यवाही करत अनेक गावठी मद्याचे ड्रम व भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. गावठी मद्य निर्मिती करणारे पोलिसांचा सुगावा लागल्याने फरार झाले आहेत.

- Advertisement -

याबाबत पोलिस स्थानिक नागरीकांकडून माहिती घेत संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत मोठ्या प्रमाणावर मद्याच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्याने पोलीस प्रशासनाचे स्थानिक ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : एमआयडीसीतील कंपनीतून सव्वा दोन लाखांच्या स्क्रॅपची चोरी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar एमआयडीसीतील मिस्त्री ऑटो इंजिनिअर प्रा. लि. कंपनीतून तब्बल दोन लाख 20 हजार रुपये किमतीचे 2.5 टन वजनाचे लोखंडी शीट व स्क्रॅपचे तुकडे...