नाशिक : पायात चप्पल न घालता हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन ढोल वाद्य वाजत, देशासाठी शहीद झालेल्या जवानांचे फलक घेऊन तसेच ३० किलो लगेजचा वजन घेऊन दररोज २० तेपंचविस किलोमीटरचा पायी प्रवास गावातील मंदिरांमध्ये मुक्कामाला राहिल्यानंतर तेथील नागरिकांना देशभक्तीचा व शांतीचा संदेश देणे… आणि स्वतःचा विकास करताना आपल्या देशाचा विकास करण्यासाठी वेळ द्या, असे आवाहन करीत पुढील प्रवासासाठी निघणे… असा दिनक्रमच लक्ष्मण नामदेव गणवीर ,वय ६५ , इंदौर, मध्य प्रदेश) या युवकांचा बनला आहे.
शांतीचा संदेश देण्यासाठी इंदौर,देवाज, उजैन,ओंकारेश्वर, मंडलेश्वर, महेश्वर, खलघाट, सप्तशृंगी गड, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शनी शिंगणापूर अशी पायी यात्रा सुरू केलेला हा युवक गुरुवारी सप्तशृंगी गडावर आला होता.
देशामध्ये वाढत असलेला भ्रष्टाचार, काही राजकीय नेत्यांचे स्वार्थासाठी सुरू असलेले राजकारण, याबाबत जनजागृती करण्यासाठी गणवीर पायी वारीसाठी इंदौर येथून निघाला. मुळचा मध्य प्रदेशातील इंदौर गावात राहतो. परंतु आपण देशासाठी चांगले काम करावे, या उद्देशाने लक्ष्मण आपले गाव सोडून २९ जुलै २०१९ रोजी इंदौर ते देवास, उजैनओंकारेश्वर, मंडलेश्वर, महेश्वर,खलघाट,सप्तशृंगी गड,पंचवटी,त्र्यंबकेश्वर, शिर्डी शनी सिग्नापूर,तसेच इंदौर अशी पायी वारी सुरू केली आहे.
रस्त्यात भेटणाऱ्या वाटसरूंना ‘भारतीय सेनेचा आदर करा, देशाच्या विकासासाठी आपला वेळ द्या, असा संदेश देतो. याबाबत देशदूत ’शी बोलताना गणवीर यांनी सांगितले की, ‘नागरिकांना शांतीचा संदेश देण्यासाठी देशासाठी शहीद झाले. श्रद्धांजली वाहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही पदयात्रा सुरू केली असून वाटेमध्ये भेटणारे नागरिक खूप मदत करतात,’ असे त्याने सांगितले.