Saturday, May 4, 2024
Homeनाशिकउद्योग क्षेत्रास ‘या’ नियम अटींवर देणार परवानगी

उद्योग क्षेत्रास ‘या’ नियम अटींवर देणार परवानगी

सातपूर : कोरोनाच्या संक्रमणानंतर थंडावलेल्या औद्योगिक चाकांना पुन्हा एकदा गती मिळणार असून, नाशिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योग सुरू होण्यातील अडचण दूर झाली आहे.

दि. २० एप्रिल पासून नाशिक शहर व नगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना परवानगी देण्यात आली होती. यापार्श्‍वभूमीवर सुमारे १३५० उद्योगांनी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या परवानग्या थेट ऑनलाइन मिळत असल्याने त्या उद्योगांना येत्या दोन-तीन दिवसात गती मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

त्याच पार्श्वभूमीवर काल नाशिक औद्योगिक क्षेत्रातील सातपूर अंबड उद्योग भागात व सिन्नरच्या औद्योगिक क्षेत्रात असलेल्या उद्योगांनाही काठी शर्तींवर परवानगी देण्याचे शासनाने मान्य केले आहे.

यात प्रामुख्याने उद्योगक्षेत्रात कामगारांची निवासाची व्यवस्था करावी ही शक्य नसल्यास कामगारांच्या वाहतुकीसाठी बस अथवा मिनीबस ची व्यवस्था करावी तसेच कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित अंतर सँनीटायझेशन मास्क यांची व्यवस्था करणे बंधनकारक ठेवण्यात आले असल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.

उद्योगक्षेत्राला दिलासा
शासनाने ग्रामीण भागात पाठोपाठ शहरी भागातील उद्योगक्षेत्र यांना परवानगी दिलेली असल्याने सर्वच उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. उद्योगाचे अडकलेली कामे त्यासोबत प्रलंबित राहिलेली उत्पादनाची प्रक्रिया उद्योगांना पुरवायचा तयार माल व मागील प्रलंबित बिलांची मागणी या सर्व प्रक्रियांना गती मिळणार असून त्यामुळे पुन्हा एकदा उद्योगांची नवसंजिवनी मिळण्याची शक्यता आहे.
– वरूण तलवार अध्यक्ष आयमा

उद्योग सुरू करण्याला जरी परवानगी मिळाली असली तरी सर्वांनी सुरक्षिततेचे अंतर व शासनाने दिलेले नियम पाळणे गरजेचे आहे.

अन्यथा पुन्हा उद्योगक्षेत्राला बंदचा सामना करावा लागू नये, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी कामगारांना संख्येने कामावर जावे लागत असले तरी येणार्‍या काळात सर्वांना कामावर घेतले जाणार आहे. त्यामुळे इतरांनीही काळजी करून उतावीळ होऊ नये
-शशी जाधव अध्यक्ष निमा

- Advertisment -

ताज्या बातम्या