Saturday, May 4, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर : लॉकडाऊन काळात शहराचे साडे बारा कोटीचे नुकसान

त्र्यंबकेश्वर : लॉकडाऊन काळात शहराचे साडे बारा कोटीचे नुकसान

त्र्यंबकेश्वर : लॉक डाऊनच्या काळात त्र्यंबकेश्वर नगरीचे अंदाजे साडे बारा कोटीचे नुकसान झाले आहे. यामुळे होणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला असून शहराच्या तिजोरीत खडखडाट पाहायला मिळत आहे.

दरम्यान लॉकडाऊन चा दुसरा टप्पा थोड्याच दिवसांत संपणार आहे. परंतु या लॉकडाऊनच्या काळात शहराला मिळणार महसूल बंद झाल्याने अंदाजे साडे बारा कोटीचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळते आहे.

- Advertisement -

बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग येथे हजारो लाखो भाविक भेट देत असतात.तसेच विदेशी पर्यटक देखील या ठिकाणी येत असतात. यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक महसुल त्र्यंबकेश्वर शहरातून मिळत असतो.

तसेच शहरातील त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त, सर्व धार्मिक विधी बंद आहेत. यामुळे जवळपास पन्नास दिवसाचा लॉक डाऊन आजपर्यंत झाला आहे. एकूण या कालावधीत विचार करता अंदाजे साडे बारा कोटींचे नुकसान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या