Thursday, May 23, 2024
Homeनाशिकनांदगाव : अज्ञात इसमाकडून पन्नास वर्षीय भिकाऱ्याचा खून

नांदगाव : अज्ञात इसमाकडून पन्नास वर्षीय भिकाऱ्याचा खून

नांदगाव : शहरातील रेल्वे काँलनी परिसरातील पटांगणात एका पन्नास वर्षीय भिक्षा मागणाऱ्या राजु सपकाळे उर्फ मामाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला
मृतदेह आढळून आला आहे. सदर घटनेमुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शहरातील रेल्वे काँलनी परिसरातील पटांगणात एका पन्नास वर्षीय भिक्षा मागणाऱ्या राजु सपकाळे (५०) उर्फ मामा हा गेल्या अनेक दिवसांपासून एक झोपडीत राहत होता. सकाळी आज सकाळी साडेसात वाजेच्या राजु सपकाळे याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला आहे.

- Advertisement -

नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मृतदेहाच्या बाजूला दगड आढळून आल्याने अज्ञात इसमाने खून डोक्यात दगड घालून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनास्थळी पोलीस उप अधिक्षक समीरसिंग साळवे यांनी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या आहेत. सफाई कामगार यशवंत बाळनाथ इघे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष मटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक दिपक सुरवाडकर करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या