Wednesday, May 22, 2024
Homeनाशिकनवश्या गणपती परिसर लॉकडाऊन; तर सातपुरचे सर्व रुग्ण निगेटिव्ह

नवश्या गणपती परिसर लॉकडाऊन; तर सातपुरचे सर्व रुग्ण निगेटिव्ह

सातपूर : नवश्या गणपती मंदिर परिसरात दुसरा रुग्ण सापडल्याने पुन्हा एकदा या परिसराला लॉक डाऊन करण्यात आले असून सँनीटायझर व व धूर फवारणी च्या माध्यमातून परिसराला निर्जंतुक करण्यात येत आहे.
नवशा गणपती परिसरातील पहिला रुग्ण निगेटिव आल्याने परिसरातील प्रतिबंधित क्षेत्र लवकरच सूरळीत होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र प्रसूतीसाठी दवाखान्यात दाखल  झालेल्या महिलेला करोनाची बाधा असल्याने पुन्हा एकदा नवशा गणपती मंदिर परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून येथील आरोग्य सुविधा गतिमान करण्यात आले आहे.
सातपूरचे रुग्ण निगेटिव्ह
सातपूर परिसरातील आधीच्या चार प्रतिबंधित क्षेत्रामध्ये असलेले रुग्ण निगेटिव्ह झालेले असल्याने रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे यापूढे परिसराला काही दिवसांसाठी प्रतिबंधित ठेवण्यात आले असले तरी लवकरच या परिसर करोना मुक्त होणार असल्याची शक्यता आहे.
सातपूर अंबड लिंक रोड वरील संजीव नगर भागात पुण्याहून आलेल्या मुलामुळे बाधित झालेल्या नागरिकांची प्रकृती पूर्णता सुरक्षित असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले असल्याने व त्यानंतरही घरात त्यांना 14 दिवस क्वारंटाईन केल्यानंतर शुक्पारवारपासून हा परिसर नागरिकांना मुक्त करण्यात आला असल्याने परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेत समाधान व्यक्त केले आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या