Sunday, April 27, 2025
Homeक्रीडाइगतपुरीचा जुबेर पठाण ‘नाशिक श्री’

इगतपुरीचा जुबेर पठाण ‘नाशिक श्री’

नाशिक । प्रतिनिधी

शरीर सौष्ठवाचे कसब पणाला लावणार्‍या प्रतिष्ठेच्या ‘नाशिक श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत जुबेर पठाणने आपल्या पीळदार आणि पुष्ट स्नायूंचे प्रदर्शन करून ‘नाशिक श्री 2020’ किताबावर शिक्कामोर्तब केले. नागेश दरगुडे बेस्ट पोझरचा मानकरी ठरला.

- Advertisement -

नाशिक डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोे. ने नमस्कार व्यायामशाळेचे संचालक राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू रवींद्र गायकवाड यांच्या पुढाकाराने स्पर्धा आयोजित केल्या. इगतपुरीतील म. गांधी हायस्कूल प्रांगणात झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रत्नपारखी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष नईम खान, नगरसेवक सुनील रोकडे, भगवान आडोळे, दिनाजी उघडे, उपस्थित होते.

परीक्षक म्हणून एजाज शेख, संजय तेजाळे, सुनील घरटे, प्रशांत गायकवाड व मनोज कांबळे यांनी काम पाहिले. दीपक व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी नाशिक डिस्ट्रिक बॉडी बिल्डिंग असो. चे सरचिटणीस दीपक बागुल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, भारत श्री व आशिया श्री विजेता आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू विजय भोयर यांनी आपल्या पुष्ट, दमदार स्नायूंचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली.

विजेते सौष्ठवपटू

55 किलो: रोहित चावरे, साई सिद, श्रीकांत महाजन, 60 किलो : विशाल बोंडे, भूषण वाडेकर, प्रवीण कडू, 65 किलो : जुबेर पठाण, गणेश आडोळे, सुरेंद्र आहिरे, 70 किलो : नागेश दरगुडे, आकाश तुपसुंदर, अमित शहा, 70 किलोवरील : अजय मुदलीयार, नाविद शहा, बंटी पवार.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...