नाशिक । प्रतिनिधी
राष्ट्रपती पुरस्कार विजेता जलतरणपटू स्वयंम पाटीलने एलेफंटा ते गेट ऑफ इंडिया हे 14 किमी.चे सागरी अंतर 4.19 मिनिटात पार करीत नवा विक्रम नोंदवला.
डाऊन सिंड्रोम असलेल्या 12 वर्षीय स्वयंमने सकाळी 9.00 वाजेपासून 1.19 पर्यंत स्वयंम अरबी समुद्रत जलतरण करुन विक्रम नोंदवला. यापूर्वी त्याने 5 किमी सागरी अंतर 1 तासात पोहून लिम्का रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया, वंडर बुक ऑफ इंटरनँशनल रेकॉर्ड्स मध्ये विक्रम नोंदवला होता.त्यांनंतर त्याने स्वतःचा विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित केला. अशी कामगिरी करणारा तो वयाने सर्वात लहान जलतरण पटू ठरला.
हरी सोनकांबळे, सुनिल भास्कर, वैद्य राजेंद्र खरात, डॉ. प्रकल्प पाटील, डॉ. राजेंद्र गायकवाड, अश्विनी चौमल, गिरीश वाघ, दिशांत भास्कर, आकाश पाटील, शाक्षी तेजाळे, रिजवान, योगेश पाटील, प्रीतेश डांगे, शशीकांत शहा, चंद्रकांत शहा, करण पलये आदीचे स्वयंमला सहकार्य लाभले. मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग, मालवण, कर्नाटक, गुजराथ येथील 5 कि..मी. पर्यंतचा स्पर्धा मध्ये भाग घेत स्वयंमने दैदिप्यमान कामगिरी केली.
यापूर्वी 1.5 किमीचे सागरी अंतर संकॉर्क टू गेट वे ऑफ इंडिया पूर्ण करुन अनेक पुरस्कार मिळवले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत थायलंड येथे झालेल्या नाँरमल कँटेगिरीत भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्यापैकी 350 स्पर्धकापैकी, 23 देशामध्ये सर्वात लहान खेळाडू म्हणून त्याचा गौरव झाला.