Saturday, November 23, 2024
Homeक्रीडानाशिककर विद्यार्थ्यांचा किक बॉक्सिंगमध्ये डंका

नाशिककर विद्यार्थ्यांचा किक बॉक्सिंगमध्ये डंका

नाशिक । किक बॉक्सिंगमध्ये नाशिकच्या दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर नाशिकची मान उंचावली आहे. रुपेश रामसुरेश वर्मा आणि सुबोध हरिश पै अशी त्यांची नावे असून पंजाब येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील डीएसओ आंतरशालेय किक बॉक्सींग 2019 या स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदकांसह विजेता चषक जिंकला.

लुधियाना, पंजाब येथे नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या होत्या. त्या या दोघा खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. किक बॉक्सिंग प्रकारात 14 वर्षाखालील (63 किलो )गटात सुबोध पै याने बाजी मारत सहावा क्रमांक पटकावला आणि चषक जिंकला, तर रुपेश वर्मा याने 14 वर्षांखालील (52 किलो) मुलांच्या गटात सुवर्णपदक मिळवले. या दोघांना चॅम्पियन्सचे प्रशिक्षक राजेश गुप्ता आणि शिवा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisement -

त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल नाशिक येथे संपन्न झालेल्या तिसर्‍या आझाद कप चॅम्पियनशीप स्पर्धेदरम्यान ’आझाद’चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद त्रिपाठी आणि राष्ट्रीय सरचिटणीस अनुज कुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नाशिकचे क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, मुख्य प्रशिक्षक सत्यजीत चौधरी, आझाद कप स्पर्धेचे प्रमुख सचिन पवार, एसएसडी मुख्य प्रशिक्षक भुषण ओहोळ यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

प्रशिक्षक राजेश गुप्ता आणि त्यांचे सहकारी ’सेल्फ डिफेन्स’ प्रकारातील विविध खेळांचे प्रशिक्षण देत असतात, आजतागायत त्यांचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या