पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती शिवाजी चुंबळे बाजार समितीच्या कामकाजाविषयी चुकीचा गैरसमज निर्माण करून समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत असल्याने चुंबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सभापती संपत सकाळे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
- Advertisement -
दरम्यान चुंबळे यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे आणि दमदाटीमुळे कर्मचारी दहशतीच्या सावटाखाली असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
त्यांचे काही बरेवाईट झाल्यास त्यास चुंबळे यांनाच जबाबदार धरू अशी तक्रार तक्रार केली आहे.