नाशिक : आडगाव येथील माळोदे मळ्यात काल (दि.३०) रात्री नऊच्या सुमारास वाजता बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरांना जीव गमवावा लागला आहे.
- Advertisement -
दरम्यान आडगाव शिवारातील माळोदे मळ्यात जुन्या पाझर तलावाजवळ सदाशिव किसन माळोदे व नामदेव परशराम माळोदे या शेतकऱ्यांची शेती आहे.
(दि. ३०) रोजी रात्रीच्या सुमारास या शेतकऱ्यांच्या मळ्यात बांधण्यात आलेल्या दोन वासरांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही वासरे जागीच ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी या परिसरात वनविभागाने पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी आडगाव नागरिकांनी केली आहे.