Friday, May 16, 2025
Homeनाशिकसटाणा : ब्राम्हणगाव येथील हिरावाडी शिवारात गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन घरांचे नुकसान

सटाणा : ब्राम्हणगाव येथील हिरावाडी शिवारात गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन घरांचे नुकसान

सटाणा : ब्राह्मणगाव येथील हिरावाडी शिवारात गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन घरे जळून खाक झाली आहेत. यामध्ये साधारण दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान येथील आदिवासी वस्तीवर सकाळच्या सुमारास आदिवासी वस्तीतील स्वयंपाक चालू असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे शेजारच्या घराने देखील पेट घेतला. या दोन घरांपैकी झूराबाई नागु पवार यांचे बोकड व बकऱ्या विक्रीचे सुमारे दीड लाख रुपये, धान्य व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. तर श्रावण कुवर यांच्या घरातील साठवलेले गहू, तांदूळ, बाजरीसह जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच बागलाण तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही कुटुंबाना संसारपयोगी साहित्य व जीवनावश्यक वस्तूची मदत केली. तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, ग्रामसेवक निंबा सोनवणे व तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : ‘पूर्णवाद’ पतसंस्थेकडून ठेवीदाराला 42 लाखाला चुना

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांची मुदत ठेव परत न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठेवीदार अमेय रमेश मुदकवी (वय...