Friday, May 3, 2024
Homeनाशिकविंचुरला आढळला करोना पॉझिटिव्ह रुग्ण

विंचुरला आढळला करोना पॉझिटिव्ह रुग्ण

विंचुर : येथील पोलीस कर्मचारी (वय ४८) यांची करोना चाचणी पॉसिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान हे पोलीस कर्मचारी मालेगाव येथे बंदोबस्तासाठी तैनात होते. बंदोबस्तावर असतांना ताप येत असल्याने त्यांचे मालेगाव येथे (दि.२८) रोजी स्वॅब घेण्यात आले होते. त्यानंतर ते विंचुर येथील निवास्थानी आले असता (दि.२९) रोजी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने ते विंचुर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले असता त्यांनी प्राथमिक उपचार करुन येथील शासकीय रुग्णालयात पाठवले असता.

- Advertisement -

येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.आर. जाधव यांना करोना व्हायरसची लक्षणे जाणवल्याने सदर रुग्णास नाशिक येथे शासकीय रुग्णालयात पाठवले. तेथे जुजबी उपचार करुन रुग्णास त्याच दिवशी परत पाठविण्यात आले.

परंतु आज रोजी (दि.०१) रोजी रुग्णास जास्त त्रास होवु लागल्याने ते पुन्हा येथील शासकीय रुग्णालयात आले असता डॉ.जाधव यांनी सखोल चौकशी केली असता रुग्णाने मालेगाव येथे बंदोबस्तास असल्याची व तेथे स्वॅब नमुना घेतला असल्याची माहिती दिली. त्यानंतर डॉ.जाधव यांनी त्यांच्या वरीष्ठांशी संपर्क साधुन सदर रुग्णाच्या तपासणी अहवाला संदर्भात विचार पुस केली असता सदर अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निषप्न झाले.

त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एन के चव्हाण, डॉ.साहेबराव गावले, डॉ.पी.आर. जाधव आदी वैद्यकीय पथक घेवुन रुग्णाच्या घरी जावुन रुग्णास व त्याचे कुटुंबातील रुग्णाची पत्नी, दोन मुले, दोन मजुर अशा एकुण सहा जणांना येवला येथील बाभुळगावच्या कोव्हिड १९च्या केंद्रात उपच्यार्थ दाखल करण्यात आले.

तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना येथील कर्मवीर विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले. ता.२ रोजी १७६३ घरातील १०६०० लोकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.जाधव यांनी दिली. तसेच आजुबाजुचा परीसर बंद करुन औषधाची फवारणी करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या