तामिळनाडू : कर्जबाजारी पतीने आत्महत्या केल्यानंतर मुलांचं पोट कस भरायचं? हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर असलेल्या आईने स्वतःचे केस विकून आपल्या तीन मुलांची भूक भागविल्याचा प्रकार तामिळनाडूत घडला आहे.
दरम्यान तामिळनाडूतील सेलम येथील हा मनाला चटका लावणारा प्रसंग घडला आहे. पतीने आत्महत्या केल्यानंतर महिलेला सहारा नसल्याने तीन मुलांची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली होती. अशावेळी पटीने साठवलेली तुटपुंजी रक्कम संपल्याने क्काही दिवस उपाशीपोटी काढावे लागले. परंतु त्यानंतर या महिलेच्या मुलांची परिस्थिती बिकट झाल्याने तिने हे पाऊल उचलले.
अशा विदारक परिस्थितीत या महिलेवर मुलांच्या संगोपनाची जबाबदारी येऊन पडली. तिने सुरवातीला नातेवाईक, ओळखीच्या लोकांची मदत मागितली. परंतु कुणीहि तिला मदत केली नाही. तिचे पती असतांना दोघेजण वीटभट्टीवर मजुरी करत होते. पण सेल्वमला छोटा व्यवसाय सुरू करायचा होता. यामुळे त्याने २.५० लाख रुपयांचे कर्ज घेतले. पण त्यात त्याची फसवणूक झाली आणि संपूर्ण कुटुंब कर्जात बुडाले. यामुळे धक्का बसलेल्या सेल्वमने आत्महत्या केली.