Wednesday, May 21, 2025
Homeदेश विदेशकोरोना व्हायरसचा कहर; चीन नष्ट करणार ८४ हजार करोड नोटा!

कोरोना व्हायरसचा कहर; चीन नष्ट करणार ८४ हजार करोड नोटा!

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे सावट पसरले असून आतापर्यंत जवळपास ७१ हजार तीनशे २६ संसर्गित झाले आहेत. यापैकी ७० हजार चीनमधील नागरिक आहेत. जगभरात या व्हायरसमुळे १७७५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु आता चीनसमोर नवा पेच निर्माण झालं असून त्यांना करोडो व्हायरस संक्रमित नोटा नष्ट करावा लागणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान महिनाभरापासून कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात थैमान घातले आहे. सध्या चीन सरकार तेथील नागरिकांच्या हाताला लागून संक्रमित झालेल्या नोटा नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत. लाखो करोडो नोटांना बदलणार असून हॉस्पिटल, बाजार आणि वाहतूक सेवेतील नोटा नष्ट करणार आहेत.

चीनमधील सेंट्रल बँकेच्या शाखेने म्हटले आहे कि, बाजारातून आलेल्या सर्व नोटांची विल्हेवाट लावणार आहोत. पीपल्स बँक ऑफ चायना ने सांगितले कि, सर्व कागदी नोटांची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे उदाहरण देणारी घटना; कुठे आणि नेमके काय घडले?…

0
  देवगाव। वार्ताहर Devgaon प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे उदाहरण देणारी घटना (दि.20) रोजी भरवसफाटा-कोळपेवाडी रस्त्यालगत महालक्ष्मी मंगल कार्यालयात घडली. विवाहसोहळ्यात हरवलेली 2 तोळ्यांची सोन्याची पोत प्रामाणिकपणे मूळ...