Saturday, April 26, 2025
Homeदेश विदेशचीनसह जगभरात कोरोना व्हायरसचे सावट; काय आहे कोरोना विषाणू?

चीनसह जगभरात कोरोना व्हायरसचे सावट; काय आहे कोरोना विषाणू?

नवी दिल्ली : सध्या जगभरात भीतीचे सावट पसरले असून यास कोरोना विषाणू कारणीभूत आहे. गेल्या महिनाभरापासून चीनमध्ये या विषाणूमुळे नऊ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे चीनसह भारत, अमेरिका तर इतर देशांनाही अलर्ट करण्यात आले आहे.

दरम्यान चीनमध्ये मागील काही दिवसामध्ये एका अज्ञात विषाणूची लागण होऊन रूग्णांच्या संखेमध्ये वाढ होत असल्याने आता चीन सोबत आरोग्य संघटनेकडूनही ‘कोरोना विषाणू’ बाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चीनमध्ये सध्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २९१ रूग्णांना कोरोना व्हायरस संबंधित ‘न्युमोनिया’ या आजारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

कोरोना विषाणू काय आहे?
कोरोना या व्हायरसमुळे रूग्णाला सर्दी, तापाची लक्षणं सुरवातीच्या टप्यात दिसतात. त्यानंतर श्वसनामध्ये त्रास जाणवू लागल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर २०१९ महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला. त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ३१ डिसेंबर २०१९ दिवशी याबाबत अलर्ट जारी केला होता.

चीन व्यतिरिक्त थायलंड, जपान आणि अमेरिकेमध्येही कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रूग्ण आढळले आहेत. दरम्यान हे रूग्ण चीन मधून त्यांच्या मायदेशी परतले आहेत. त्यामुळे आता या आजाराबाबत दहशत वाढत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या