Monday, November 25, 2024
Homeदेश विदेशनिर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंहची फाशी निश्‍चित

निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंहची फाशी निश्‍चित

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याने राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या याचिकेवर आज न्यायालयानत सुनावणी करत त्याची दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. मुकेश सिंहसह या प्रकरणातील चारही दोषींना येत्या शनिवारी, एक फेब्रुवारीला सकाळी फाशी देण्यात येणार आहे.

न्या. आर. बानूमथी यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यीय खंडपीठाने मुकेश सिंह याची याचिका फेटाळली. केंद्र सरकारने आवश्‍यक कागदपत्रे न दिल्यानेच राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली, असा युक्तिवाद मुकेश सिंह याच्या वकिलांनी केली. पण न्यायालयाने तो फेटाळला. या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

- Advertisement -

या प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असताना आपल्यावर अत्याचार करण्यात आले. आपल्याला यातना सहन कराव्या लागल्या, असेही मुकेश सिंहच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. पण तुरुंगात अत्याचार करण्यात आले. या आधारावर राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळण्याला आव्हान दिले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्या. अशोक भूषण आणि न्या. ए एस बोपण्णा यांचाही या खंडपीठामध्ये समावेश आहे.

आपल्या दया याचिकेवर वेगाने निर्णय घेण्यात आला नाही, हा युक्तिवादही न्यायालयात फेटाळण्यात आला. मुकेश सिंह याच्या दया याचिकेवर सर्वात कमी कालावधीत निर्णय घेण्यात आला, असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून यावेळी करण्यात आला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या