Monday, November 18, 2024
Homeनगरपंचायत समितीवर सभापती, उपसभापती निवडी 7 जानेवारीला

पंचायत समितीवर सभापती, उपसभापती निवडी 7 जानेवारीला

सदस्यांना नोटिसा : उपजिल्हाधिकाजयांकडे पीठासीन अधिकार्‍यांची जबाबदारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीच्या निवडीचा कार्यक्रम 7 जानेवारीला निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक पंचायत समिती सभागृहात दुपारी तीन वाजता पीठासीन अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पदाधिकारी निवडीची सभा होणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील सर्व 14 पंचायत समित्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 20 डिसेंबर रोजी संपल्याने नवीन पंचायत समिती सभापतींची आरक्षण सोडत 12 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यात श्रीगोंदा व कोपरगाव पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी, तर पारनेर, नेवासा, शेवगाव (व्यक्ती), संगमनेर, राहाता, नगर व कर्जत (महिला) या सात ठिकाणी सर्वसाधारण गटाला संधी मिळाली.

जामखेडचे सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले. मात्र, जामखेडला या आरक्षणाचा सदस्यच नसल्याने तेथे पेच निर्माण झाला. याबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागवले. जोपर्यंत जामखेडचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत पंचायत समिती सभापती निवडी जाहीर होत नव्हत्या.

अखेर तब्बल 18 दिवसांनंतर जामखेड पं. स. सभापतीची आरक्षण सोडत पुन्हा काढण्याबाबत शासनाने कळवले. त्यानुसार सोमवारी (दि. 30) जिल्हाधिकारी कार्यालयात ही आरक्षण सोडत झाली. चिठ्ठ्या टाकून काढलेल्या या सोडतीत जामखेडचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी व्यक्ती) प्रवर्गासाठी निघाले.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लगेच पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रत्येक पंचायत समितीच्या सभागृहात 7 जानेवारीला दुपारी 3 वाजता सदस्यांची सभा होणार असून त्यात नूतन सभापती, उपसभापती निवडले जाणार आहेत. दरम्यान, त्याच दिवशी सकाळी 11 ते 1 या दरम्यान, इच्छुकांना अर्जाचे वाटप व स्वीकृती होईल. 14 उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाजयांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे.

हे आहेत पिठासीन अधिकारी
महेश पाटील (अकोेले), जितेंद्र पाटील (संगमनेर), पंकज चौबळ (कोपरगाव), गोविंद शिंदे (राहाता), अनिल पवार (श्रीरामपूर), शाहूराज मोरे (नेवासा), चंद्रशेखर देशमुख (शेवगाव), देवदत्त केकाण (पाथर्डी), श्रीनिवास अर्जुन (नगर), अजय मोरे (राहुरी), सुधाकर भोसले (पारनेर), श्रीमती नजहे (श्रीगोंदा), अर्चना नष्टे (कर्जत) जयश्री माळी (जामखेड) यांचा यात समावेश आहे.

टाकळीभान गटातील जिल्हा परिषद सदस्या संगीता गांगुर्डे यांनी अनुसूचित जमातीच्या उमेदवारास आरक्षण न मिळाल्याचा आरोप करत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर 2 जानेवारी रोजी सुनावणी होत आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या