Tuesday, May 21, 2024
Homeनगरखासगी रुग्णालयात फक्त अत्यावश्यक रुग्ण सेवा

खासगी रुग्णालयात फक्त अत्यावश्यक रुग्ण सेवा

अन्य रुग्णांना फोनवर सल्ला : ग्रामीण भागात नागरिकांचे हाल

अहमदनगर (प्रतिनिधी)- खूपच गरज असेल तरच दवाखान्यात या. अन्यथा घरबसल्या डॉक्टर फोनवर सांगतील ते औषधे घ्या, उपाय करा असा निर्णय नगर शहरातील घेतला आहे. जिल्हा प्रशासनाकडून रुग्णालयात गर्दी होत असून किरकोळ कारणासाठी रुग्ण रुग्णालयात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नगरमधील डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

नगरमधील साईदिप हॉस्पिटलचे संचालक डॉ. दीपक यांच्या नेतृत्वाखाली काही डॉक्टरांनी मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली. या भेटीत डॉक्टर आणि दवाखान्यातील गर्दी टाळण्यासाठीचे उपाय यावर चर्चा झाली. दवाखान्यातील ओपीडीत गर्दी होणार नाही यासाठी केवळ एकच पेशंट ओपीडीत घेतले जाणार आहे.

फोनवरून संबंधिताला अपॉइंटमेंट दिली जाणार आहे. अगदीच गरज असेल तरच दवाखान्यात बोलविले जाईल. अन्यथा डॉक्टर फोनवरच ईलाज अन् मेडिसीन सांगणार आहेत. ज्यांना ओपीडी बंद करायची ते करू शकतात असा पर्यायही यावेळी समोर आला. दवाखान्यात आलेले पेशंट व त्यांच्यासोबतचे नातेवाईक अशी गर्दी दवाखान्यात होते. काळजी म्हणून दोन माणसांमधील अंतर वाढलेले ठेवावे. काळजीच्या दृष्टीकोनातून हे करणे गरजेचे आहे. तशी चर्चा कलेक्टरांसोबत झाल्याचे डॉ. दीपक यांनी सांगितले.

दरम्यान, ग्रामीण भागात खासगी डॉक्टरांनी रुग्णांना सेवाच न देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या धसका या डॉक्टरांनी घेतला असून यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा आणि वैद्यकीय सुविधांची बोंबाबो असल्याने आता शहरातली डॉक्टर ओपीडी बंद ठेवणार असले तर नागरिकांची काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या