पुणे – पुणे विद्यापीठाच्या परीक्षा लेखी स्वरूपातच होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी दिलेली आहे. विद्यार्थ्यांना इंटरनेटचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे परीक्षा संचालक डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी म्हटले आहे. परीक्षा लेखी स्वरुपात घेण्यात यावी असे ठरवण्यात आलेले आहे.
महाविद्यालयांच्या परीक्षा कशा होणार आहेत, याबाबत मोठा प्रश्न होता. अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार असे ठरवण्यात आले. पण तरीही या परीक्षा घ्यायच्या कशा हा मोठा प्रश्न विद्यापीठासमोर होता. यासाठी समित्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामुळे त्यांच्यात एकमत झाले आहे. ऑनलाईन परीक्षा न घेता लेखी स्वरूपात पारंपारिक पद्धतीने घेतली जावी, असे काही समित्यांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी असतात, त्यांना इंटरनेट कितपत मिळू शकेल हे सांगता येत नाही. असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे लेखी स्वरूपात परीक्षा घेण्यात यावी, असे सध्या तरी ठरवण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत सर्व समित्यांचे अहवाल सादर होतील. फायनल अहवाल येतील तेव्हा महाविद्यालयाच्या स्तरावर या परीक्षा होणार आहेत.