मुंबई – कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याचा फटका देशातील नागरिकांना, उद्योगांना बसला आहे. त्याच पार्श्वभूीवर रेपो दरात कपात केल्याची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदमध्ये केली आहे. त्यामुळे रेपो दर 4 टक्क्यांवरुन 3.75 टक्क्यांवर आला आहे.
ते बोलतांना म्हणाले, कोरोनाच्या परिस्थितीवर सरकारची नजर असून योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जात आहे. कोरोनामुळे जीडीपी कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. G20 या देशांच्या संघटनेमध्ये भारताची आर्थिक स्थिती मजबूत असून जगभरात आतापर्यंत 9 ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. देशातील बँकांमध्ये पैशाची कमी नसून देशभरातील ९१ टक्के एटीएम चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बाजारात चलनाचा तुटवडा जाणवू नये म्हणून 50 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त मदतीची घोषणा त्यांनी केली आहे.