दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूीवर देशातील संचारबंदी दरम्यान रिझर्व्ह बँकेने रेपो रेट मध्ये कपात केली आहे. सकाळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बोलतांना म्हणाले, देशभरात कोरोनामुळे अनेक लोकांची आर्थिक अडचण झाली आहे. त्यामुळे ५.१५ रेपो रेट असून तो ७५ पॉइंट ने कमी करून ४.४५ वर आणला आहे. याचा फायदा देशातील घर, गाडी तसेच अन्य हप्ते भरणाऱ्या अनेक नागरिकांना होईल. असे त्यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासातील रेपो दरात सर्वात मोठी कपात समजली जात आहे.