Saturday, November 16, 2024
Homeनगरपोलीस मुख्यालयात उद्या झेंडावंदन; पोलीसांचाही होणार सन्मान

पोलीस मुख्यालयात उद्या झेंडावंदन; पोलीसांचाही होणार सन्मान

पालकमंत्री मुश्रीफ, मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती

अहमदनगर (प्रतिनिधी) – येथील पोलीस मुख्यालयात उद्या रविवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन केले जाणार आहे. दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहे.

- Advertisement -

देशभक्तीपर गीते आणि घोषणांनी प्रजासत्ताक दिनी आसमंत दुमदुमणार आहे. नगर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात संचलनाची रंगीत तालीम सुरू असून सर्व ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नगर शहरात प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. पोलिस मुख्यालयात(पोलिस परेड ग्राऊंड) येथे उद्या रविवारी (दि.26) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सकाळी 9.15 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान अनेक शाळा महाविद्यालयात सकाळी 7 वाजेच्या सुमारास ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

आज (शनिवारी) विविध शाळा महाविद्यालयाच्या प्रांगणावर ध्वजरोहण कार्यक्रमासाठी मैदानाची आखणी करण्यात करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. ध्वजाला सलामी देण्याकरिता एनएसएस, स्काऊट-गाईड, नेव्ही आदी विद्यार्थी पथकांची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यात विविध घोषणा व देशभक्तीपर गीत गाऊन सराव करण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.

दरम्यान आज शहरातील भिंगारवाला चौक, वाडियापार्क चौक, जुने महापालिका रोड, चितळे रोड, दिल्लीगेट, प्रोफेसर कॉलन चौक, भिस्तबाग, केडगाव, भिंगारवेस सह विविध ठिकाणी ध्वजापासून ते शर्टला लावण्याचे कागदी फ्लॅग, टॅग विक्रीची दुकाने थाटली आहेत.

शिवभोजन केंद्राचे उद्घाटन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन योजनेचे घोषणा केली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्या प्रजासत्ताक दिनी नगर शहरातील पाच शिवभोजन केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

पोलिसांचाही सन्मान
चांगली कामगिरी करणारे व गुन्हे उघडकीस आणण्याचे कौशल्य दाखविणार्‍या जिल्हा पोलीस दलातील 21 अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. मंदार जावळे, दिलीप पवार, श्रीहरी बहिरट, अरुण परदेशी, दौलतराव जाधव, संदीप पाटील, पवन सुपनर, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डिले, संदीप पवार, जालिंदर लोंढे, किशोर जाधव, योगेश गोसावी, अभिजीत अरकल, राहुल गुंडू, संदीप चव्हाण, विजय नवले, रशीद शेख, अजित पटारे, संतोष बोळगे,

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या