Wednesday, May 22, 2024
Homeनगरसंगमनेरच्या व्यक्तीला करोना

संगमनेरच्या व्यक्तीला करोना

संपर्कातील 7 व्यक्तींना तपासणीसाठी नगरला नेले

संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर येथून नाशिक येथे ह्दय बायपास शस्त्रक्रियेकरिता गेलेल्या व्यक्तीचा नाशिक येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्वॉब घेतला होता. त्याचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. तर सदर व्यक्तीच्या संपर्कातील हायरिक्स 7 व्यक्तींचे स्वॉब घेण्यासाठी त्यांना सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथे पाठविण्यात आल्याची माहिती तहसिलदार तथा इंसिडंट कमांडर अमोल निकम यांनी दिली.

- Advertisement -

शहरातील एक 70 वर्षीय व्यक्ती नाशिक येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये 8 मे रोजी हृदय बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झाली होती. सदर व्यक्तीच्या शस्त्रक्रियेपूर्वी तेथील डॉक्टरांनी स्वाब घेतला व एसआरएल लॅब मुंबई या खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला. त्याचा अहवाल 10 मे रोजी नाशिक येथील खाजगी हॉस्पिटलला प्राप्त झाला व ती व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

सदरची माहिती खाजगी रुग्णालयाने प्रशासनास कळविली नाही. त्यानंतर, त्या व्यक्तीस 11 मे 2020 रोजी रात्री उशिरा सामान्य रुग्णालय नाशिक येथे दाखल केले. सदर व्यक्तीच्या सोबत असणार्‍या त्यांच्या मुलाचा स्वाब सामान्य रुग्णालय नाशिक येथे 12/5/2020 रोजी तपासणी साठी घेण्यात आला. मात्र त्याचा अहवाल दिनांक 15/5/2020 रोजी करोना निगेटिव्ह आला.

याबाबत सविस्तर माहिती नाशिक प्रशासनाने अहमदनगर प्रशासनास 17 मे रोजी उशिरा कळविली. त्यानंतर शासनाकडील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील हाय रिक्स अशा 7 व्यक्तींना स्वाब तपासणीसाठी सामान्य रुग्णालय अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या