संगमनेर (प्रतिनिधी)- शहरातील अरगडे गल्ली येथील कापड दुकानाच्या पाठीमागे सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांनी पथकासह जावून छापा टाकला. या छाप्यात 21 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रकमेसह 99 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल शनिवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास करण्यात आली.
अरगडे गल्लीतील जितेंद्र क्लॉथ स्टोअर्सच्या पाठीमागे मटका जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांना मिळाली. स्वतः पंडीत हे व कार्यालयातील कर्मचारी सहाय्यक फौजदार आप्पासाहेब शेटे, अशोक शिदोरे, पोलीस नाईक अनिल कडलग यांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
या छाप्यात संतोष गोरख गवळी (रा. ओझर, ता. संगमनेर), कारभारी बापुराव शेरमाळे (रा. समनापुर), नंदकुमार हिरामण बापटे (रा. मोमीनपुरा), महेश धोंडू नढे (रा. मोमीनपुरा), भरत बाबुराव पाबळे (रा. निंबाळे, ता. संगमनेर), चंद्रकांत निवृत्ती गवळी (रा. मालदाड रोड, संगमनेर), शंकर संतु जेडगुले (रा. वेल्हाळे), शिवाजी शंकर राऊत (रा. घुलेवाडी), आप्पासाहेब बाबा शिंदे (रा. साळीवाडा), बुकी मालक कपिल धर्माजी चिलका (रा. पदमानगर), बाबुनाथ विष्णु ताजणे (रा. देवाचा मळा, संगमनेर), तानाजी भागवत चांडे (रा. समनापुर, ता. संगमनेर), मच्छिंद्र दामोदर हासे (रा. चिखली), लक्ष्मण गेणुजी पठाडे (रा. मालदाड रोड), जयराम म्हातारबा करंजेकर (रा. नांदुरखंदरमाळ, ता. संगमनेर), रामनाथ लक्ष्मण वामन (रा. सुकेवाडी), भिकाजी किसन दिघे (रा. वेल्हाळे), हिरा शंकर साठे (रा. देवगाव, ता. संगमनेर), राजेश विष्णु सोनी (रा. जोर्वेनाका), रामकिसन चंदाराम वंजारी (रा. जोर्वेनाका), मारुती रावसाहेब गुंजाळ (रा. झोळे, ता. संगमनेर) यांना विनापरवाना बेकायदा कल्याण मटका नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून 48 हजार 450 रुपये रोख व 51 हजार 300 रुपयांचे मोबाईल असा एकूण 99 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक अनिल कडलग यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील 21 जणांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए. के. आरवडे करत आहे.