Saturday, November 16, 2024
Homeनगरसर्वच शाळांमध्ये वाजणार ‘वॉटर बेल’

सर्वच शाळांमध्ये वाजणार ‘वॉटर बेल’

मुख्याध्यापकांना वेळ निश्‍चितीचे अधिकार

अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळेत खेळण्याच्या किंवा अभ्यासाच्या नादात मुले पाणी प्यायचे विसरतात, त्यामुळे आवश्यकतेपेक्षा कमी पाणी शरीरात जाते. यामुळे अनेक शारीरिक समस्याही निर्माण होतात. ते टाळण्यासाठी आता शाळांमध्ये ठराविक काळानंतर मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी वॉटर बेल वाजविण्यात येणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे.

- Advertisement -

केरळ राज्यात असा उपक्रम सर्वप्रथम राबविण्यात आला. तेथे या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच त्याचे चांगले परिणाम दिसून आले. त्यामुळे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांसह नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा ‘वॉटर बेल’चा उपक्रम सर्वच शाळांमध्ये राबविण्यात यावा अशी मागणी पालकांमधून आली. याची दखल घेत सरकारनेच आता यात पुढाकार घेतला आहे.

का घेतला निर्णय?
शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. पाणी कमी प्यायल्याने मुलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा येणे, मूत्रमार्गात संसर्ग होणे, मुतखडा होणे, चिडचिडेपणा वाढणे आदी त्रास होण्याची शक्यता असते.

स्वच्छतागृह वापरण्याची मुभा
शाळेच्या वेळापत्रकात तीन वेळा घंटा वाजविण्याबाबत मुख्याध्यापकांनी वेळ निश्‍चित करावी. त्यामुळे या राखीव वेळेत विद्यार्थ्यांना आवश्यतेनुसार पाणी पिता येईल. परिणामी त्यांची पाणी पिण्याची मानसिकता होईल आणि पुढे ती सवय होईल. तसेच या वेळेत मुलांना स्वच्छतागृह वापरण्याची मुभा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या