Tuesday, March 25, 2025
Homeजळगावशेंदूर्णी : कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर

शेंदूर्णी : कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर

आंबेवडगाव/शेंदुर्णी –

पाचोरा-शेंदुर्णी रस्त्यावर मालखेडा गावाजवळ आज दि.१९ रोजी एरटीका मारूती सुझूकी कंपनीची कार क्र. एम.एच.१५- जी.ए. ८२९७ हिचा भीषण अपघात झाला असून यात एका तरूणाचा मृत्यू तर दुसरा गंभीर असल्याची दुर्दैवी घटना घडली.

- Advertisement -

अपघातात मृत्यू झालेला योगेश राजेश कुमावत हा युवक शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील सुप्रसिध्द गायक अलबम फेम सचिन कुमावत यांचा पुतण्या असल्याची माहिती मिळत आहे. तर त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र अक्षय गुजर हा गंभीर आहे.

आज सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान शेंदुर्णीकडे येत असताना अपघात घडला. स्त्याच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाला ही कार आदळल्याने कारचा चुराडा झाला आहे. तपास पोलीस करत असून अपघाताचे कारण अद्याप स्पस्ट झालेले नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी ठार; मुलगी गंभीर जखमी

0
ओझे | विलास ढाकणे | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर झालेल्या आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये (Accident) पती-पत्नी जागीच ठार (Killed)...