Tuesday, May 28, 2024
Homeनगरसोनईत ना. शंकरराव गडाखांचे स्वागत; पुन्हा दिवाळी

सोनईत ना. शंकरराव गडाखांचे स्वागत; पुन्हा दिवाळी

सोनई (वार्ताहर)- ना. शंकरराव गडाख यांचे सोनई येथे आगमन झाले असता त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या निवसस्थानी नेवासा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील हितचिंतकानी गर्दी केली होती. 25 वर्षांपासून त्यांचे रस्त्यावरील संपर्क कार्यालय असलेल्या हॉटेलमध्ये त्यांनी बाकडावर बसून चहा घेतला.

शंकरराव गडाख यांनी सकाळी 9 वाजता वंजारवाडी येथे भगवानबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी केली. महिलांनी औक्षण केले. सोनई येथील मानाचा मारुती मंदिरातही जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेने त्यांचा सन्मान केला .

- Advertisement -

पदं येतात जातात पण आपल्या माणसापासून मला कोणतेही पद, मंंत्रिपद दूर होऊ देणार नाही याची मी नक्कीच काळजी घेणार आहे, असे प्रतिपादन नामदार शंकरराव गडाख यांनी सोनई येथे कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान केले. मिळालेले मंत्रिपद तालुका आणि महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी मी पणाला लावणार असल्याचे ते म्हणाले.

यशवंतराव गडाख साहेबांनी राजकारणातून समाजकारण केले त्याचां वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या धोरणाप्रमाणे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हेच माझे धोरण असेल, असेही ते म्हणाले.

आदर्शगाव हिवरेबाजारचे पोपटराव पवार, आमदार लहू कानडे, माजी आमदार पांडुरंग अभंग, दौलतराव पवार, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगर जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, ज्येष्ठ नेते बन्सीभाऊ म्हस्के, शिवसेना नेते शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, अनिल कराळे, जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे, बाळासाहेब हराळ, राजेंद्र गुंड, नगरचे अनिल लोखंडे, शिर्डीचे अभय शेळके, विजय जगताप, नगरचे नगरसेवक सचिन जाधव, अविनाश घुले, नितीन मरकड, अजय ढोणे यांच्यासह नेवासा तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

चहाची टपरी जनसंपर्क कार्यालय
सोनईतील त्या चहा टपरीवर नामदार शंकरराव गडाख यांनी नववर्ष सुरुवातीला सकाळी चहा घेतला. तसेच टपरी शेजारचे त्यांचे संपर्क कार्यालयावर कार्यकर्त्यांनी नामदार शंकरराव गडाख जनसंपर्क कार्यालय असे नामकरणही केले.

शंकरराव गडाख यांची राजकारणात सुरुवात झाल्यावर ते सोनई येथील चहाच्या टपरीवर बसत होते. आमदार झाल्यावरही त्यांनी जनतेला भेटण्यासाठी तेथेच संपर्क कार्यालय बनविले. आता नामदार झाल्यावर त्यांच्या जुन्या ठिकाणी बसून त्यांनी चहा घेतला व आपला सामान्य कार्यकर्त्यांत बसण्याचा पिंड सोडला नाही व कुठलाही बडेजाव न ठेवता प्रत्येकाची आस्थेने विचारपूस केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या