Sunday, November 24, 2024
Homeक्रीडान्यूझीलंडची क्लीन स्विपकडे वाटचाल; विजयासाठी २९७ धावांची गरज

न्यूझीलंडची क्लीन स्विपकडे वाटचाल; विजयासाठी २९७ धावांची गरज

माउंट मांगूनुई : भारत आणि न्यूझीलंड मधील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा सामना माउंट मौंगगुई येथे खेळला जात आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने केएल राहुलयाचे शतक आणि श्रेयस अय्यर याच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित ओव्हरमध्ये सात विकेट्स गमावून २९६ धावा केल्या.

दरम्यान न्यूझीलंडची सुरवात दमदार झाली असून अद्याप एक विकेट गमावून धावसंख्याही स्थिर ठेवण्यात यश मिळवले आहे. २५ ओव्हरचा खेळ संपला आहे आणि न्यूझीलंड संघाने भारताच्या २९७ धावांच्या प्रत्युत्तरात एक विकेट गमवून १४९ धावा केल्या आहे. केन विल्यमसन २१ आणि हेन्री निकोल्स ५९ धावा करून खेळत आहे. यजमान किवी संघाला जिंकण्यासाठी १५० चेंडूत १५३ धावांची गरज आहे.

- Advertisement -

टीम इंडियाप्रमाणे किवींचा संघ वनडेत भारताला क्लीन स्वीप देतो का? याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

-सलिल परांजपे देशदूत नाशिक ,

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या