Saturday, March 29, 2025
Homeदेश विदेशभारतातील कारखान्यांना साखर निर्यातीची संधी

भारतातील कारखान्यांना साखर निर्यातीची संधी

नवी दिल्ली – कच्च्या साखरेच्या निर्यातीची मोठी संधी भारतीय साखर उद्योगास मिळणार आहे. इंडोनेशियाकडून भारताच्या कच्च्या साखरेच्या आयातीला सक्षम करण्यासाठी आपल्या गुणवत्तेच्या मानदंडांमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता आहे. सध्याच्या हंगामात इंडोनेशियाला कमीत कमी 35 लाख टन कच्च्या साखरेची आवश्यकता आहे, जी भारतीय साखर कारखान्यांसाठी संधी आहे.

इंडोनेशिया साखरेची आयात करतो, ज्यामध्ये ईक्कुंसा चा स्तर 1,200 इतका किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. ते केवळ कच्च्या साखरेची आयात करतात, ज्यामध्ये साधारणपणे ईक्कुंसा चा स्तर सर्वात अधिक असतो, आणि भारताची सर्वात चांगली गुणवत्ता असणारी कच्ची साखरही या आयात मानदंडांना पूर्ण करत नाही. ईक्कुंसा च्या प्रमाणाला 500 पासून 600 पर्यंत केले जावू शकते. यावर औपचारिक घोषण लवकरच होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

इंडोनेशिया थाईलंडकडून साखर आयात करतो, ज्यात ईक्कुंसा प्रमाण अधिक आहे. थाइलंड मध्ये यावर्षी दुष्काळ पडला आहे आणि थायलंड आपल्या घरगुती आवश्यकतांना पूर्ण करु शकलेला नाही. ब्राजीलचा हंगाम अजून सुरु झालेला नाही. ज्यामुळे भारत आता एकटाच साखर पुरवठा करणारा देश आहे.

कोरोना : चीनला होणारी निर्यात थांबली
कोरोना विषाणमुळे चीन वगळता इतर सर्व देशांमध्ये साखर निर्यात नियमित सुरु आहे. मात्र चीनला होणारी साखरेची निर्यात मात्र थांबली आहे. चीनला भारतातून दरमहा दहा ते पंधरा हजार टन पांढरी साखर निर्यात होते. चीनला निर्यात होणारी साखर इतर देशांच्या तुलनेत कमी असली तरी, त्यावर थोडासाच परिणाम झाल्याचे साखर तज्ञांनी सांगितले. चीनमध्ये सध्या कच्च्या साखरेची निर्यात होत नाही. दुसरीकडे याचा फटका भारतीय साखर उद्योगाला बसण्याची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Udayanraje Bhosale : वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत उदयनराजे भोसले यांनी मांडली भूमिका;...

0
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत सुरू झालेला वाद आणखीनच पेटला असून, या प्रकरणावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही...